आज भारत जिंकला तर महिलांना मोफत जेवण,मुंबईत हाॅटेलमालकाची आॅफर

आज भारत जिंकला तर महिलांना मोफत जेवण,मुंबईत हाॅटेलमालकाची आॅफर

आज गटारी सेलिब्रेशनही देखील सुरू आहे. हाच मुहूर्त साधत मुंबईतल्या म्हावरं बकरं हाॅटेलने खवय्यांना भन्नाट आॅफर दिलीय.

  • Share this:

23 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड महिला वर्ल्डकप फायनलचा सामना सुरू आहे. त्यातच आज गटारी सेलिब्रेशनही देखील सुरू आहे. हाच मुहूर्त साधत मुंबईतल्या म्हावरं बकरं हाॅटेलने खवय्यांना भन्नाट आॅफर दिलीय. भारतीय महिलांनी वर्ल्डकप जिंकल्यावर सर्व वयोगटातील महिलांनी जेवण फ्री देणार असल्याचा बोर्ड लावालाय.

गटारी म्हटलं की पुरुषांनाच साजरा करण्याचा अधिकार आहे. पण महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. महिला क्रिकेट टीमने पुरुषांच्या टीमपेक्षा चांगली कामगिरी केली आहे म्हणूनच टीम इंडिया आज जिंकली तर फक्त महिलांसाठी मोफत जेवणाची आॅफर दिली आहे अशी माहिती हाॅटेल मालक सारंग पाथरकर यांनी दिली. त्यामुळे क्रिकेट शौकिनांची पर्वणी झालीय.

First published: July 23, 2017, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading