पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून महिला पोलिसांनाच गंडवलं, महाठग अखेर जेरबंद!

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून महिला पोलिसांनाच गंडवलं, महाठग अखेर जेरबंद!

पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आलय.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोबर: फसवणारे हे कसे, कधी, कुणाला, गंडवतील हे काही सांगता येत नाही. आणि त्यांच्या जाळ्यात कोण फसतील हेही काहीच सांगता येत नाही. दिवस रात्र फसवणुकीचे गुन्हे शोधून आरोपींना पकडणारे पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनाच एका महाठगाने फसवल्याचं उघड झालं आहे. नवी मुंबईतलं हे प्रकरण असून यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत चक्क महिला पोलिसांनाच लुटणाऱ्या आरोपीला कळंबोली पोलिसांनी अटक केलीय. आरोपी मिलिंद देशमुख याने आपले बनावट फेसबुक पेज ओपन केले होते. गणेश मोरे या बनावट नावाने फेसबुक वरून आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत तो महिला पोलीसांना फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. पोलीस युनिफॉर्ममधला त्याने फोटोही टाकला होता.

बोलण्यात चतुर असलेल्या मिलिंदने फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. त्याच्या चतुर बोलण्यात अनेक पोलीस कर्मचारी फसल्या गेल्या. या पोलीस कर्मचाऱ्यांनाही तो अधिकारीच आहे असं वाटलं होतं.

मैत्री केल्यानंतर तो विविध कारणाने पैशांची गरज असल्याचे भासवून समोरच्या महिला पोलीसांकडून पैसे उकळत असे. वारंवार तो पैसे मागत असल्याने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला.

त्यांनी अधिक माहिती काढली असता आपल्या मैत्रिणीलाही त्याने असेच फसविल्याचे समजले. अखेर सापळा रचून कल्याण वरून या बनावट पोलीस अधिकाऱ्याचा अटक करण्यात आली.

पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आलय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 30, 2020, 11:04 PM IST
Tags: police

ताज्या बातम्या