'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ

'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ

मुंबई-दिल्ली-लखनौ या इंडिगोच्या विमानात बॉम्ब आहे, असं एका सिंगापूरच्या महिलेनं पोलिसांना कळवलं. यानंतर पोलिसांनी तातडीने या विमानाची तपासणी केली.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबई-दिल्ली-लखनौ या विमानात बॉम्ब आहे, अशी माहिती एका महिलेकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या या विमानाची तपासणी केली. पण तपासणीदरम्यान पोलिसांना या विमानात काहीही सापडलं नाही.

मुंबई-दिल्ली-लखनौ या इंडिगोच्या विमानात बॉम्ब आहे, असं एका सिंगापूरच्या महिलेनं पोलिसांना कळवलं. यानंतर पोलिसांनी तातडीने या विमानाची तपासणी केली. पण या विमानात काहीही मिळालं नसल्याने पोलीस आता फोन करून माहिती देणाऱ्या महिलेची चौकशी करत आहेत.

'मी अशा लोकांना ओळखते ज्यांनी याआधीही विमानात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे,' असा दावाही संबंधित महिलेनं केला आहे. त्यामुळे सहार पोलिसांनी या महिलेची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, महिलेने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिल्यानंतर काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. पण या विमानात काहीही सापडलं नसल्याने आता सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

VIDEO : अवमान करणारा वादग्रस्त छिंदम आता शिवरायांसमोर नतमस्तक

First published: December 15, 2018, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading