विवेक गुप्ता, प्रतिनिधी
मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबईच्या रेल्वे स्थानकात महिलेने बाळाला जन्म दिल्याचं ऐकलं असेल. पण आता एका महिला प्रवाशानं विमानातच बाळाला जन्म दिला आहे. यानंतर लगेचच एतिहाद अबुधाबी - जकार्ता EY 474 विमानाचं आज मुंबई एअरपोर्टवर इमर्जन्सी लॅण्डिंग केलं.
विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोचल्या क्षणी आई आणि बाळाला मुंबईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही हे विमान मुंबई एअरपोर्टवरच आहे.
असं सांगितलं जात आहे की, विमानात असतानाच महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यानंतर विमानातील कॅबिन क्रू आणि अन्य महिलांच्या मदतीने गर्भवती महिलेची विमानाच प्रसूती केली गेली. याच दरम्यान विमान चालकाने याची माहिती ट्रॅफिक कंट्रोल रूमला दिली आणि त्यानंतर विमानाचं सुरक्षित लॅण्डिंग करण्यात आलं.
काही दिवसांआधी अशीच घटना न्यूयॉर्कमध्ये घडली होती. एअर फ्रांसकी फ्लाइट जी पॅरिसहून न्यूयॉर्कला जात होती त्यावेळी विमानातील एका 41 वर्षाच्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या.
त्यानंतर विमानात असलेल्या मूळच्या भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी महिलेची सुखरूप डिलीव्हरी केली. त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्मानंतर संपूर्ण विमानात एकच जल्लोष उठला.
VIDEO : विमानात उत्स्फूर्त नृत्य करून एअर होस्टेसनी दिला प्रवाशांना सुखद धक्का
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा