पती आणि लेकीसमोर महिलेचा जागीच मृत्यू, मुंबईमध्ये कंटेनरने चिरडलं!

पती आणि लेकीसमोर महिलेचा जागीच मृत्यू, मुंबईमध्ये कंटेनरने चिरडलं!

महिला दुचाकीवरून जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. याच वेळेस गाडीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि...!

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

घोडबंदर, 11 ऑक्टोबर : भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच रस्त्यांमुळे आणखी एका महिलेला जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.भरधाव कंटेनरमुळे घोडबंदरवर पुन्हा एक बळी गेला आहे. गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा इथे हा अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भाईंदर पाडा इथून ही महिला आपल्या पती सोबत दुचाकीवरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि यात महिलेने जागीच आपला जीव गमावला आहे.

महिला दुचाकीवरून जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. याच वेळेस गाडीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिझ्या अंगावर तो भरधाव वेगाने कंटेनर गेला. ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये महिलेचा पती आणि लहान मुलगी बचावली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीव जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारीच भिवंडीमध्ये एका भीषण अपघातात अवघ्या 23 वर्षाच्या तरुणीने जीव गमावला आहे. लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉ. तरुणीवरच काळानं घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्य़ाची स्वप्न उद्ध्वस्त केली. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

इतर बातम्या - निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

भिवंडीत वाडा रोडवर दुगाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ.नेहा आलमगिर शेख असं या 23 वर्षीय तरुणीचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अनगाव येथील टोल नाका बंद केला होता.

नेहाचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. लग्नाची अनेक स्वप्न रंगवली होती. नव्या जीवनाची सुरुवात नव्या अशा आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नेहाबाबत मात्र काळानं घात केला. बोहल्यावर चढण्याआधीच नेहाचा खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या - युतीत कितीही गोडवा असला तरी शिवसेनेची ही खदखद कधीच मिटणार नाही!

डॉ.नेहा शेखचा कसा झाला अपघात

लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान, त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्यानं आणि नेहाचा तोल गेला. तिला सावरण्याचा एक क्षणही मिळाला नाही आणि ती खाली पडली. याच वेळी मागून येत असलेल्या भरधाव ट्रकचं चाक नेहाच्या अंगावरून गेल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

वारंवार खड्ड्यांबाबत पालिकेकडे प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्यानं एका बाजूला नागरिक संताप्त व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे नेहाच्या जाण्यानं शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या - आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

First published: October 11, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading