माहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत सापडला मृतदेह, हत्येनंतर महिलेचे तुकडे!

माहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत सापडला मृतदेह, हत्येनंतर महिलेचे तुकडे!

एका बॅगेमध्ये महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. सगळ्यात गंभीर म्हणजे मृतदेहाचे धड गायब असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

कल्याण, 08 डिसेंबर : गेल्या दोन दिवसांआधी माहिमच्या बीचवर सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता पुन्हा कल्याणच्या स्टेशन परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. टॅक्सी स्टँड परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. एका बॅगेमध्ये महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. सगळ्यात गंभीर म्हणजे मृतदेहाचे शिर आणि धड गायब असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॅग ठेवुन जाणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले पोलिसांचा तपास सुरू आहे. यासाठी स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले असून प्रवाशांचीही चौकशी करण्यात येत आहेत. पण गजबजलेल्या स्टेशन परिसरात असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात तपासण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन आरोपी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी मुंबईत माहिम येथील बीचवर असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला होता. एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं. मुंबई पोलिसांच्या युनिट 5 ने समुद्र किनारी सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचा छडा लावायला आहे. गुन्हे शाखेने वाकोल्यातून 19 वर्षीय तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहेय प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली आहे.

इतर बातम्या - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पण झालेल्या चमत्कारावर विश्वास बसणार नाही!

काय आहे प्रकरण?

मुंबईतील एक पंचतारांकीत हॉटेलमध्ये म्युझिक शो आर्टिस्ट बॅनोटो रिबेलो (वय-62) हे सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला मशीद येथे एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी आरोपी मुलीला दत्तक घेतले होते. या तरुणीचे तिच्या पेक्षा 3 वर्षे वयाने लहान असलेल्या मुलाशी प्रेमसंबंध होते. त्याला बॅनोटो यांचा विरोध होता. त्यात बॅनोटो यांनी संपत्ती आपल्याला मिळावी, यासाठी तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी बॅनोटो यांची राहत्या घरी हत्या केली. बांबू आणि चाकूने मारहाण करुन ही हत्या करण्यात आली. बॅनोटो रिबेलो हे मरत नसल्याने त्याच्या तोंडावर हिट स्प्रे मारण्यात आला. एवढेच नाही तर त्यांच्या मृत शरीराचे तीन भागात तुकडे केले. ते वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून तिन्हीही सुटकेस मिठी नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यातील एक सुटकेस पोलिसांना माहिम दर्ग्याच्या मागे समुद्रात सापडली. त्यात पोलिसांनी एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांग सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली.

मोठी बातमी - नराधमाने मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

अशी सुटली 'मर्डर मिस्ट्री'

या प्रकरणी माहिम पोलिसांच्या अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या हत्येचा तपास गुन्हे शाखा कक्ष क्रं.5 कडे सोपवण्यात आला. पोलिसांना समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयवांसोबत एक शर्ट, पॅंट होती. शर्टच्या कॉलरवर 'अल्मो' टेलरचे लेबल होते. 'अल्मो' टेलर हा कुर्ला (पश्चिम) येथील बेलग्रामी रोडवर आहे. पोलिसांनी तिथे चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली. या कामात पोलिसांनी फेसबुकचीही मदत घेतली. नंतर पोलिसांनी बॅनोटो यांच्या दत्तक मुलीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रिया रिबेलो आणि तिच्या सोळा वर्षीय प्रियकराने गुन्हा कबूल केला.

इतर बातम्या - महाराष्ट्राची लेक देशात झळकली, शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Dec 8, 2019 02:01 PM IST

ताज्या बातम्या