लोकलसमोर उडी घेणारी महिला बचावली, पण गेली कुठे ?

लोकलसमोर उडी घेणारी महिला बचावली, पण गेली कुठे ?

लोकल निघून गेल्यावर मात्र ही महिला दिसंत नाही म्हणून सर्वजण अचंबित होतात

  • Share this:

04 जुलै : आत्महत्या करण्यासाठी एका महिलेनं लोकलसमोर उडी घेतली पण सुदैवाने रुळावर मध्य भागात पडल्यामुळे ती बचावते. पण आश्चर्याची बाब म्हणजे लोकल अंगावरून गेल्यानंतर ना ही महिला सापडते ना या महिलेचा मृतदेह...

मुंबईत लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक प्रकार घाटकोपरमध्ये घडला.  घाटकोपर स्टेशनवर एक महिला आत्महत्या करण्यासाठी लोकल ट्रेनसमोर उडी मारते. प्लॅटफॉर्मवरील प्रवासी मोटरमनला याची कल्पना देतात. त्यामुळे मोटरमन तत्काळ लोकल थांबवतो. प्रवासी तिला काढण्याचा प्रयत्न करतात पण ही महिला दिसत नाही. लोकल निघून जाते. त्यानंतर मात्र रुळावर ही महिला दिसत नाही. त्यामुळे ही महिला कुठे गेली असा प्रश्न निर्माण झाला.

हा सर्व प्रकार घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडतो आणि तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद होतो. लोकल निघून गेल्यावर मात्र ही महिला दिसंत नाही म्हणून सर्वजण अचंबित होतात. कदाचित ही महिला दुसऱ्या बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून निघून जात असेल. पण रेल्वे पोलीस किंवा आरपीएफ एखादा प्रवासी जखमी किंवा मृत्यू झाल्यास नोंद घेते या प्रकारात मात्र काहीच न झाल्याने याची नोंद घेण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 07:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading