मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: तपासणीसाठी आलेल्या महिलेनं केला गेम; हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून उकळले 2 लाख

Mumbai: तपासणीसाठी आलेल्या महिलेनं केला गेम; हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून उकळले 2 लाख

Crime in Mumbai: मुंबईतील चारकोप परिसरात एका 53 वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये (Honey trap) अडकवून त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) चारकोप परिसरात एका 53 वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याची (extort 2 lakh) धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं फिर्यादी डॉक्टरच्या रुग्णालयात शिरून त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले आहेत. यावेळी आरोपींनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी 53 वर्षीय डॉक्टरने चारकोप पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 2 महिलांसह 5 जणांना अटक (5 arrested) केली आहे. चारकोप पोलिसांनी पाचही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुधीर शेट्टी (वय-53) असं फिर्यादी डॉक्टरचं नाव असून ते चारकोप परिसरातील सेक्टर 3 मधील रहिवासी आहेत. पोलिसांनी शनिवारी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे.

हेही वाचा-शिवसेना आमदाराला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीला राजस्थानातून अटक

नेमकी घटना काय आहे?

8 नोव्हेंबर रोजी आरोपी महिला फिर्यादी डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी आली होती. यावेळी डॉक्टर तपासणी करत असताना, आरोपी महिलेनं फिर्यादीचा व्हिडीओ तयार केला. यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी महिलेनं फिर्यादीकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. पण फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिला. हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा प्लॅन फसल्यानंतर, आरोपी महिला 19 नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसह एका महिलेला घेत फिर्यादीच्या क्लिनिकमध्ये घुसली.

हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

संबंधित सर्व आरोपींनी क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरांना मारहाण केली, तसेच त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर डॉक्टर सुधीर शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्वांना शनिवारी अटक केली आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai