• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO: मंत्रालयाच्या गेटवर ST कर्मचारी भगिनींचा आक्रोश; आत्मदहनाचा केला प्रयत्न

VIDEO: मंत्रालयाच्या गेटवर ST कर्मचारी भगिनींचा आक्रोश; आत्मदहनाचा केला प्रयत्न

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं आहे. आज काही महिला एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न (attempt to Self immolation) केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं आंदोलन (ST employee protest) करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडली असून अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. पण आंदोलनकर्त्या एका गटाने आपल्या मागण्या लावून धरत आंदोलन तीव्र केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं आहे. हेही वाचा-दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, नाना पटोलेंचा थेट आरोप आज काही महिला एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न (attempt to Self immolation) केला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल टाकून मंत्रालयाच्या गेटसमोरचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पण जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते मंत्रालयासमोर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऐन दिवाळी सणाच्या काळात एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यातील लाखो प्रवाशांचा गैरसोय झाली आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं महामंडळानं अनेक ठिकाणी पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित खाजगी वाहनांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुट करण्यात आली आहे. एसटी कर्माचाऱ्यांच्या आंदोलनात सध्या फूट पडली असून 3 हजार कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: