सुरक्षा आहे कुठे? मुंबईच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर बलात्कार

सुरक्षा आहे कुठे? मुंबईच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर बलात्कार

महिलांची सुरक्षा आहे कुठे ? महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ.

  • Share this:

मुंबई, 14 मे : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कारण सायनच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात एका महिलेवर बलात्कार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मदत करण्याच्या बहाण्यानं अज्ञात व्यक्तीनं बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या देखभालीसाठी पीडित महिलादेखील सोबत म्हणून रुग्णालयातच राहतच होती. यादरम्यान, मदत करतो अशी बतावणी करत आरोपी बाह्यरुग्ण विभाग असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या घटनेमुळे पालिका रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचंही उघड झालं आहे.

वाचा :पोलीस शिपायाच्याच पत्नीला घरातून जबरदस्तीनं उचललं आणि केला बलात्कार

दरम्यान, देशभरातच महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. चीड आणणाऱ्या या घडामोडींदरम्यान आता एका पोलीस शिपायाच्या पत्नीला पोलीस वसाहतीतून जबरदस्तीनं उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीनं पीडितेला दिली होती. 7 मे रोजी राजस्थानमधील डुंगरपूर येथे ही घटना घडली आहे.अलवर येथील कठमूरमध्ये सामूहिक बलात्काराच्याच दिवशी ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झाला आहे.

वाचा :विकृतीचा कळस! विवाहबाह्य प्रेमाला नकार दिल्यानं पत्नीच्या गुप्तांगात टाकलं बक्कल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभदेव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भूधर येथील रहिवासी असलेल्या सुरेशवर एका पोलीस शिपायाच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला दोन वर्षांपूर्वी शिकवणीचे वर्ग घेत होती. आरोपी सुरेशदेखील तिच्यासोबत शिकवत असे. दोघांची ओळख शिकवणीदरम्यानच झाली. आरोपी सुरेश आणि पीडित महिलेचे फोनवरील संभाषण वाढलं. यादरम्यानच आरोपीनं पीडित महिलेचाअश्लील फोटो घेतला आणि त्यावरून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Loading...

कुख्यात गुंडाचा 'वाढीव'पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 09:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...