मुंबई हादरली! आधी बलात्कार मग गळ्यावरून फिरवला सुरा, वांद्र्यात बेवारस पडला होता मृतदेह

मुंबई हादरली! आधी बलात्कार मग गळ्यावरून फिरवला सुरा, वांद्र्यात बेवारस पडला होता मृतदेह

Rape and Murder: एका महिलेवर बलात्कार करून तिचा गळा चिरून हत्या केल्याची एक धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात घडली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे: मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात एका महिलेवर बलात्कार करून गळा चिरून तिची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स परिसरात असणाऱ्या MTNL जंक्शनजवळ संबंधित महिलेचा मृतदेह (Woman dead body found) टाकण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्रथमदर्शनी निर्घृण हत्येचं प्रकरण वाटतं होतं. मात्र वैद्यकीय तपासणीत धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास केला जात आहे.

मंगळवारी सकाळी वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील MTNL जंक्शनजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. सर्वप्रथम परिसरात राहाणाऱ्या स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला आणि याची माहिती जवळच्या नियंत्रण कक्षाला दिली. संबंधित महिलेचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत पडला होता. धारदार शस्त्रानं गळ्यावर वार करून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी वाटतं होतं. मात्र मृत महिलेच्या गुप्तांगात जखमा झाल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचा-धक्कादायक! भलत्याच कारणामुळे पत्नीची गळा आवळून केली हत्या, स्वतःही दिला जीव

दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत महिला देहव्यापार करणारी असू शकते. दरम्यान पैशाच्या वादातून महिलेची हत्या केल्याचा अंदाज बीकेसी पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही. पण परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 3:32 PM IST

ताज्या बातम्या