मुंबई, 08 सप्टेंबर : एका 32 वर्षीय महिलेने सामान्य प्रसूतीद्वारे 3 बाळांना जन्म दिला (normal delivery with three baby in Mumbai) आहे. सहसा अशा प्रकरणांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्टर म्हणतात की, हे प्रकरण दुर्मीळ आहे, कारण महिलेनं गरोदरपणाच्या 35 व्या आठवड्यात पूर्णपणे सामान्य प्रसूतीद्वारे तीन बाळांना जन्म दिला आहे आणि तीनही मुले निरोगी आहेत. मूळची उत्तर प्रदेशातील असलेली ही महिला गृहिणी आहे आणि तिचा पती मजूर आहे.
महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉक्टर हुमायरा शेख म्हणाल्या, 'आम्ही नियमित तिची तपासणी करत होतो. जेव्हा ती तपासणीसाठी आली तेव्हा आम्ही संपूर्ण तपासणी करत होतो. अगदी सिझेरियनची तयारीही केली होती. एवढेच नाही तर, महिलेच्या शरीरात रक्ताचा अभाव आढळून आला. यामुळे काही रक्त चढवावे लागले. महिलेने मंगळवारी रात्री उशिरा पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात आणण्यात आलं. डॉ. हुमैरा शेख म्हणाल्या की, जेव्हा आम्ही प्राथमिक तपासणी केली तेव्हा कळले की, ऑपरेशनची गरज नाही आणि सामान्य प्रसूती करता येऊ शकते.
मुलांचे वजन कमी, परंतु आरोग्य चांगले
डॉ.शेख यांनी सांगितले की आम्ही ऑपरेशनची तयारीही केली होती. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्या महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. पण दुसऱ्या मुलाचीही लगेचच प्रसूती झाली. मात्र, तिसरे मूल महिलेच्या पोटात अडकले. यामुळे काही समस्या उद्भवली होती, परंतु त्याला पुरेशी जागा मिळाल्यानं त्याचीही नॉर्मल डिलीव्हरी झाली. डॉक्टरांनी सांगितले की, तिन्ही मुलं निरोगी आहेत, परंतु त्यांचे वजन कमी आहे. महिलेला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. या तिघांचे वजन अनुक्रमे 1.7 किलो, 1.8 किलो आणि 1.9 किलो आहे. डॉक्टरांनी सांगितले की, मुलं कमी वजनाची असली तरी कोणालाही श्वास घेण्यास त्रास होत नाही आणि त्यांची श्वसन प्रणाली पूर्णपणे चांगली आहे.
हे वाचा -
आता बिनधास्त खा आवडीचे पदार्थ! मसाल्याचे ‘हे’ घरगुती पदार्थ Acidity करतील क्षणात दूर
8,000 फक्त एक असतं असं प्रकरण
तज्ज्ञांच्या मते, तिळ्या मुलांच्या जन्माच्या बाबतीत प्रसूती सामान्य होण्याचं प्रमाण 8,000 पैकी फक्त एक आहे. मुंबईस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.जतिंदर कौर यांनी सांगितले की, सामान्य प्रसूतीसह तीन बाळांचा जन्म आणि तेही 35 आठवड्यांत, ही एक दुर्मीळ बाब आहे. ते अवघड आहे. डॉ. कौर यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत याआधी एकदाच पोटात तिळी मुलं असलेल्या महिलेची प्रसूती केली होती. ती प्रसूती शस्त्रक्रियेद्वारेच केली गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.