मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला 8 लाखांचा दंड; नवी मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार

भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला 8 लाखांचा दंड; नवी मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार

नवी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला,

नवी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला,

नवी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला,

  • Published by:  Meenal Gangurde

नवी मुंबई, 17 डिसेंबर : नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका उच्चभ्रू कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या महिलेकडून 8 लाखांचा दंड ठोठावला. महिलेवर आरोप आहे की, सोसायटीच्या मॅनेजमेन्ट समितीने कॅम्पसच्या आत भटक्या कुत्र्यांना खाऊ दिल्याबद्दल कारवाई केली. अंशू सिंह नावाची ही महिला नवी मुंबईच्या सी-वुड इस्टेटमधील NRI कॉम्प्लेक्समध्ये राहते. या कॉम्प्लेक्समध्ये 40 हून अधिक इमारती आहेत.  (Woman fined Rs 8 lakh for feeding stray dogs, Society in Navi Mumbai )

अंशू सिंहने दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पसच्या आवारात कुत्र्यांना खायाला दिल्याबद्दल दररोज या हिशोबाने महिलेवर 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत महिलेने सांगितलं की, मी केवळ मुक्या प्राण्यांना खायला देत होते. सोसायटीने मात्र माझ्यावर घाण पसरवण्याचा आरोप केला. माझ्यावर माझ्यावर आतापर्यंत 8 लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड जुलै 2021 पासून लावण्यात आला आहे.

अंशू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सोसायटीच्या आणखी एका सदस्यावर 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. सोसायटीचे सेक्रेटरी विनीता श्रीनंदन यांनी सांगितलं की, ट्यूशनला जाताना भटके कुत्रे लहान मुलांच्या मागे धावतात आणि वृद्ध कुत्र्याच्या भीतीने बाहेर जायला घाबरतात. आम्ही भटक्या कुत्र्यांसाठी एक जागा केली आहे. मात्र काही सदस्य अद्यापही कुत्र्यांना उघड्यावर जेवण देतात. यासाठी आम्ही दंड आकारत आहोत. आम्ही जी कारवाई केली आहे, ती सोसायटीच्या नियमांनुसार केली आहे. हे वृत्त दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

हे ही वाचा-मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

वृद्ध महिलेवर 60 हजारांचा दंड

येथे राहणारी आणखी एक महिला लीला शर्माने सांगितलं की, कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी माझ्यावरदेखील 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मी 60 वर्षांची आहे. कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी दररोज खाली येते, आणि त्यांची काळजी घेते. यात चुकीचं काय आहे?

वकील म्हणाले हा नियम कायद्याविरोधी...

डॉग लवर्सच्या मदतीसाठी पुढे आलेले वकील सिद्ध विद्या यांनी सांगितलं की, एनिमल वेल्फेयर बोर्ड ऑफ इंडियानुसार कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही प्राण्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जाऊ शकत नाही. प्राण्यांना खाऊ देण्यासाठी कोणाकडूनही दंड आकारणं कायद्याविरोधी आहे. आम्ही सोसायटीच्या विरोधात एनिमल वेल्फेअर बोर्डाकडे तक्रार केली आहे.

First published:

Tags: Dog, Mumbai