नारळाचं झाडं महिलेवर कोसळून मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

नारळाचं झाडं महिलेवर कोसळून मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

कांचन नाथ ही महिला गुरुवारी सकाळी योग क्लास करून ही महिला चंद्रोदय या सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात असताना या सोसायटीत नारळाचं झाड अचानक या महिलेच्या अंगावर कोसळलं.

  • Share this:

22 जुलै : नारळाचं झाड एका महिलेच्या अंगावर कोसळल्याची घटना चेंबुरमध्ये घडलीये.नारळाचं झाड अंगावर कोसळल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

चेंबूरच्या स्वस्तिक पार्क इथं गुरुवारी सकाळी ही घटना घडली.  कांचन नाथ ही महिला गुरुवारी सकाळी योग क्लास करून ही महिला चंद्रोदय या सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात असताना या सोसायटीत नारळाचं झाड अचानक या महिलेच्या अंगावर कोसळलं.

या सोसायटीतील रहिवशांनी हे नारळाचं झाड तोडण्याची परवानगी पालिकेच्या एम पश्चिम विभागाकडे चार महिन्यांपूर्वी मागितली होती. सोसायटीने हे झाड तोडण्यासाठी पैसेही भरले होते पण पालिकेने झाड सुस्थितीत आहे म्हणून तोडले नाही आणि ही दुर्घटना घडली. याबाबत चेंबूर पोलिसात तक्रार देण्यास सोसायटीचे पदाधिकारी गेले असता त्यांची तक्रार नोंदवली नाही उलट न्यायालयात जाण्याचा सल्ला पोलिसानी दिला.

First published: July 22, 2017, 12:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading