• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • अपघाताची माहिती मिळवण्याठी कुटुंबाची धडपड; शहरात फलक लावून केलं हे आवाहन

अपघाताची माहिती मिळवण्याठी कुटुंबाची धडपड; शहरात फलक लावून केलं हे आवाहन

15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात रेणू चौधरी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. (फोटो-लोकसत्ता)

15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात रेणू चौधरी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. (फोटो-लोकसत्ता)

Road Accident in Panvel: पनवेल-शीव महामार्गावर दहा दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात रेणू चौधरी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला (Woman died in road accident) होता.

 • Share this:
  पनवेल, 27 ऑक्टोबर: पनवेल-शीव महामार्गावर दहा दिवसांपूर्वी एक अपघात (Road accident in panvel) झाला होता. या अपघातात रेणू चौधरी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला (Woman died in road accident) होता. पण संबंधित परिसराती सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हा अपघात नेमका कसा घडला? आणि कोणी केला? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. गेल्या दहा दिवसांपासून पोलीस या अपघाताची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना अपघाताची उकल करता आली नाही. यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांनी शहरात फलक लावून (Relative erected Placard in city) अपघाताबद्दल माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अपघाताबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. तसेच त्यांना योग्य बक्षिस देण्यात येईल, असंही संबंधित फलकावर नमूद करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळवण्यासाठी शहरात अशाप्रकारचा पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा फलक पनवेल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा-ठाणे: दहावीच्या 2 तुकड्या आपसात भिडल्या; भांडणात एकाची छातीत चाकू भोकसून हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर रोजी ठाणा नाका परिसरात रेणू चौधरी या जखमी अवस्थेत आढळल्या होत्या. ठाणा नाका ते खांदेश्वर उड्डाणपूलदरम्यान हा अपघात झाला होता. कामोठे वसाहतीतील रहिवासी असणाऱ्या रेणू दसऱ्याच्या निमित्ताने पनवेलमध्ये काही कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान, ठाणा नाका परिसरात त्यांचा अपघात झाला. कोणत्यातरी वाहनाने त्यांना धडक दिली असावी असं प्रथमदर्शनी दिसत होतं. हेही वाचा- आभाळाएवढ्या मोठ्या मनाचा माणूस; निवृत्त अधिकाऱ्याने शेजारच्या दिव्यांग मुलीस दिली लाखाची गाडी भेट पनवेल शहर पोलिसांनी संबंधित वाहनाला आणि वाहनचालकाला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना अपघाताबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे मृत रेणू यांच्या भावांनी शहरात फलक लावले आहेत. यामधून त्यांनी नागरिकांना आणि प्रवाशांना या अपघाताबद्दल काही माहिती असल्यास कळवावी, असं आवाहन केलं आहे. तसेच अपघाताची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी फलकमध्ये म्हटलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: