Home /News /mumbai /

वैद्यकीय चाचणीत 'पुरुष' ठरल्यानं महिलेला नोकरी नाकारली, यावर काय म्हणालं कोर्ट?

वैद्यकीय चाचणीत 'पुरुष' ठरल्यानं महिलेला नोकरी नाकारली, यावर काय म्हणालं कोर्ट?

महाराष्ट्रातील नाशिक येथे पोलीस भरतीदरम्यान एका महिलेने कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला होता. परंतु, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला वैद्यकीय चाचणीत पुरुष घोषित करण्यात आलं. त्यानंतरही महिलेला नोकरी मिळाली नाही, यावर पीडितेने कोर्टात धाव घेतली होती.

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 मे : महाराष्ट्रातील नाशिक येथे पोलीस खात्यात भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय परीक्षेत पुरुष म्हणून एका महिलेला नोकरी न मिळाल्याने तिने न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या महिलेची दोन महिन्यांत पोलीस खात्यात नियुक्ती करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले होते. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात हा निर्णय दिला होता, त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने या महिलेची नॉन कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. महिलेने ही नोकरी स्वीकारली आहे. नाशिक ग्रामीणच्या एसपींनी 8 फेब्रुवारी आणि 18 एप्रिल 2019 रोजी दिलेले आदेश रद्द करण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. नाशिक ग्रामीण पोलीस भरती, 2018 संदर्भात नियुक्ती पत्र जारी करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला निर्देश देण्याची मागणी केली होती. 2018 मध्ये, त्यावेळी 19 वर्षीय महिलेने नाशिक ग्रामीण पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. या महिलेने तिच्या लेखी चाचणी तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील शारीरिक चाचणी दिली आणि 200 पैकी 171 गुण मिळवले. हे वाचा - 'ओठांचं चुंबन घेणं, प्रेमाने स्पर्श करणं हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान
   त्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करावी लागली, ती मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आली. जेजे हॉस्पिटलच्या शरीरशास्त्र विभागाने तिला कळवलं की, तिला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी येथे कॅरियोटाइपिंग (गुणसूत्र विकृती शोधण्यासाठी) वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील.
  जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान महिलेच्या पोटाच्या अल्ट्रासाऊंड अहवालात तिच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय नसून मूत्राशयाऐवजी प्रोस्टेटसारखी रचना असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कॅरियोटाइपिंग चाचणीत ती प्रत्यक्षात "पुरुष" असल्याचं उघड झाले. या कारणामुळे तिला नोकरी नाकारण्यात आली. हे वाचा - 'उद्धव ठाकरेंची मास्टर नव्हे लाफ्टरसभा', फडणवीसांचा थेट हिंदीतून पलटवार यानंतर महिलेने कोर्टात जाऊन न्यायाची याचना केली. आपल्या शरीराच्या अंतर्गत भागांच्या संरचनेची आपल्याला माहिती नसल्याचं तिने न्यायालयाला सांगितलं. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेला ग्रामपंचायतीने जन्म प्रमाणपत्र दिलं होतं आणि तिच्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांवरूनही ती एक महिला असल्याचं आणि तिचं संपूर्ण आयुष्य स्त्री म्हणून जगल्याचं दिसून येतं. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्या महिलेला नोकरी मिळाली आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Police, The Bombay High Court, Transgender

  पुढील बातम्या