पाण्यात उतरला होता विद्यूत प्रवाह... झटका बसताच विवाहितेचा मृत्यू

पाण्यात उतरला होता विद्यूत प्रवाह... झटका बसताच विवाहितेचा मृत्यू

सकाळी घराजवळील गिरणीत जाण्यास निघाली होती. महावितरण कंपनीची भूमीगत केबल तुटल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विद्यूत प्रवाह उतरला होता.

  • Share this:

विजय देसाई, (प्रतिनिधी)

वसई, 16 सप्टेंबर: वसईत महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराने एका विवाहितेचा बळी घेतला आहे. तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. जोत्स्ना आल्पेश परमार (वय-28) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी वसईसह परिसरात मुसळधार झाला. वसई (पश्चिम) मधील मुळगाव शांता हाऊस, डिकोन्हा चाळीत राहणाऱ्या जोत्स्ना आल्पेश परमार ही महिला सकाळी घराजवळील गिरणीत जाण्यास निघाली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महावितरण कंपनीची भूमीगत केबल तुटल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विद्यूत प्रवाह उतरला होता. त्या पाण्यातून जोत्स्ना परमार जात असताना त्यांना जोरदार झटका बसला व त्यांचा जागेवर मृत्यू झाला. याबाबत वसई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जोत्स्ना परमार या पती आणि दोन लहान मुलींसोबत मुळगाव येथे राहत होती. शवविश्चेदनानंतर त्यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी राजस्थान येथे नेण्यात आला आहे.

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दुसरीकडे, घायगाव (ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथे 35 वर्षीय विवाहित महिलेने रविवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. योगिता अप्पासाहेब साळुंके असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी तिला विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान विवाहितेने आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ट झाले नाही.

VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2019 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading