मुंबईत धक्कादायक प्रकार, छेड काढतो म्हणून महिलेने युवकाचे कापले लिंग

मुंबईत धक्कादायक प्रकार, छेड काढतो म्हणून महिलेने युवकाचे कापले लिंग

आपली सतत छेड काढतो, त्रास देतो आणि मनात लज्जा होईल असं वर्तन करतो म्हणून एका महिलेने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका ३० वर्षीय तरुणाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

डोंबिवली, 26 डिसेंबर : आपली सतत छेड काढतो, त्रास देतो आणि मनात लज्जा होईल असं वर्तन करतो म्हणून एका महिलेने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका ३० वर्षीय तरुणाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. मंगळवारी ८ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

डोंबिवलीतील नांदिवली भागात राहणाऱ्या एका महिलेने आपली छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्याकरता रेल्वेरुळाशेजारील निर्जळ स्थळी हा सगळा प्रकार केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

या महिलेने ३० वर्षीय युवकाला स्थानकाशेजारील एकांकी ठिकाणी बोलावलं. तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे २ मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे यांनी तो तरुण येताच त्याला पकडून झाडाला बांधलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

एवढंच नाही तर त्या तरुणाचे लिंग कापले आणि तिथून पसार झाले. या घटनेची माहिती स्थानिकांकडून मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला जख्मी अवस्थेत डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलं. सध्या तरुणाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलीसांनी त्या महिलेसह तिचे मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवारी दुपारी कल्याण कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया

First published: December 26, 2018, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading