खड्ड्यामुळे महिला बाईक रायडरचा मृत्यू

खड्ड्यामुळे महिला बाईक रायडरचा मृत्यू

जागृती होगळे असं या महिलेचं नाव असून ती 35 वर्षांची होती.

  • Share this:

24 जुलै : बाइक राइडिंगसाठी मुंबईतून पालघरला आलेल्या महिलेचा खड्यामुळे अपघातात मृत्यू झालाय. जागृती होगळे असं या महिलेचं नाव असून ती 35 वर्षांची होती.

डहाणू जव्हार रोडवर  वेती येथे असलेल्या खड्यात बाइक आदळी आणि ती  ट्रकखाली आली. मुंबईतून बाइक राइडसाठी येणाऱ्या बुलेट बाइक राइडर्सचा वर्षभरातला हा चौथा मृत्यू. ट्रकला ओवरटेक करत असताना बाइक खड्यात आदळून ट्रकखाली येऊन मृत्यू झाला आहे.

मूळात राज्य मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. डहाणू जव्हार रोड वरील वेती येथे याच रस्त्यावर छोटा पूल बनवला असून यावर मोठा खड्डा आहे.  येथील स्थानिक ग्रामपंचायतीने इथे स्पीड ब्रेकर करावेत म्हणून पत्रही दिले आहे. मात्र याच ठिकाणी हा अपघात घडला असून जागृती होगळे या बाइक राइडर महिलेचा मृत्यु झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading