Home /News /mumbai /

BREAKING : जितेंद्र आव्हाडांच्या शासकीय बंगल्यासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

BREAKING : जितेंद्र आव्हाडांच्या शासकीय बंगल्यासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

 पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

    मुंबई, १९ मे - राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयासमोरच (mantralaya mumbai) आज धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhads government bungalow ) यांच्या बंगल्यासमोर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड बंगला आहे. रात्रीच्या एका महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली आणि तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तृप्ती निवृत्ती कांबळे असं या महिलेचं नाव आहे. (प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा 'तो' फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ' आता हे काय ') बंगल्यासमोर असलेल्या फुटपाथव या महिलेनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आला. त्यानंतर या पोलिसांनी धाव घेऊन या महिलेल्या हातातून पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली. ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याची मााहितीसमोर आली आहे. या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस करत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर शिवसेना नाराज दरम्यान, वरळी येथील बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. (बॉलिवूडची वुमन पॉवर! फक्त आलियाचं नाही तर या अभिनेत्री गेल्यात हॉलिवूडला) 'मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही. असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय. ५० लाख किंमत द्यावीच लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. आव्हाड यांच्या निर्णयावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. घरांची किंमत ५० लाख जास्त असल्याबद्दल बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंब आणि शिवसेनं नाराजी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा आहे. त्यामुळे या निर्णयामुळे आदित्य ठाकरे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या