Home /News /mumbai /

वीज तोडल्यानं विरारमधील महिला संतापली; महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मीटररुममध्येच ठेवलं डांबून

वीज तोडल्यानं विरारमधील महिला संतापली; महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मीटररुममध्येच ठेवलं डांबून

Crime in Virar: वीज मीटर कापल्याच्या रागातून एका महिलेनं महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मीटररूमध्येच डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे.

    विरार, 06 जुलै: वीज मीटर कापल्याच्या (power outage) रागातून एका महिलेनं महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मीटररूमध्येच डांबून (MSEDCL employees kept hostage in meter room) ठेवल्याची घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांकडून अनेक विनवण्या करूनही महिलेनं मीटररूमचं लॉक उघडलं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बराच वेळ मीटररुमध्येच ताटकळत उभं राहावं लागलं आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं असून दोन्ही कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना विरार पूर्व येथील पाचपायरी परिसरातील गोविंद एकता सोसायटीत घडला आहे. तर संबंधित कर्मचारी विजबील न भरलेल्या एका मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी  कर्मचाऱ्यांचा संबंधित महिलेशी वाद झाला. थकीत विजबील भरलं असतानाही महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली. यानंतर संताप अनावर झालेल्या महिलेनं दोन्ही कर्मचाऱ्यांना मीटररुममध्ये डांबून ठेवलं. हेही वाचा-प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा लोन;पोलिसांनी सांगितलं मेसेजमागचं गौडबंगाल बाहेरून कुलूप लावल्यानं कर्मचाऱ्यांना मीटररूममधून बाहेर पडता आलं नाही. त्यांनी अनेक विनवण्या करूनही महिलेनं मीटररुमचं लॉक उघडलं नाही. दरम्यान आसपासच्या लोकांनी ही घटना आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हेही वाचा-'आई-बाबा मला माफ करा...' चिठ्ठी लिहून दहावीच्या विद्यार्थ्यानं सपवलं जीवन कालांतराने सोसायटीच्या अन्य रहिवाशांनी महिलेची समजूत काढल्यानंतर  20 ते 25  मिनिटांनी महिला कुलूप उघडण्यास तयार झाली. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना मीटररुममध्येच ताटकळत उभं राहावं लागलं आहे. स्थानिकांनी संबंधित महिला आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची समजूत घातली. यानंतर हे प्रकरण शांत झालं आहे. याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mseb, Virar

    पुढील बातम्या