मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मद्यधुंद महिलेचा मुंबई फ्लाईटमध्ये तमाशा, आधी कपडे उतरवले आणि क्रू मेंबरला केली मारहाण

मद्यधुंद महिलेचा मुंबई फ्लाईटमध्ये तमाशा, आधी कपडे उतरवले आणि क्रू मेंबरला केली मारहाण

झिंगाट झालेली महिला विमानात झाली 'सैराट', कपडे काढून क्रू मेंबरला केली मारहाण

झिंगाट झालेली महिला विमानात झाली 'सैराट', कपडे काढून क्रू मेंबरला केली मारहाण

झिंगाट झालेली महिला विमानात झाली 'सैराट', कपडे काढून क्रू मेंबरला केली मारहाण

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : विमान प्रवासासंदर्भातल्या अनेक घटना सध्या एकामागून एक चर्चेत आहेत. त्यात सोमवारी (30 जानेवारी) आणखी एका घटनेची भर पडली आहे. अबूधाबीवरून मुंबईला येणाऱ्या एका इटालियन प्रवासी महिलेने स्वतःकडे इकॉनॉमी क्लासचं तिकीट असतानाही बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला आणि केबिन क्रूने तिला विरोध केल्यावर तिने हल्ला केला आणि काही कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ती विमानाच्या सीट्सच्या मधल्या जागेतून फिरली.

    पाओला पेरुशिओ नावाच्या 45 वर्षं वयाच्या महिलेने घातलेल्या या गोंधळामुळे प्राथमिक चौकशीनंतर मुंबईतल्या सहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी तिच्याविरुद्ध केस दाखल करून तिला अटक केली. तिच्या पासपोर्टवरच्या माहितीनुसार, इटलीतल्या साँड्रिओ इथे तिचा जन्म झालेला आहे.

    'एअर विस्तारा'च्या यूके 256 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. त्या विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबीवरून उड्डाण केलं आणि ते पहाटे 4.53 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. यादरम्यानच्या काळात ही घटना घडली.

    Air India च्या ‘फ्लाइट अल्कोहोल सर्व्हिस पॉलिसी’मध्ये मोठा बदल; एकदाच मिळणार..

    त्याबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. 'विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेली ही महिला अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक उठून बिझनेस क्लासमधल्या सीटवर जाऊन बसली. केबिन क्रूमधल्या दोघांनी जाऊन तिची चौकशी केली आणि काही मदत हवी आहे का ते विचारलं. त्यावर तिने काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांनी तिला स्वतःच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली.

    तेव्हा तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि केबिन क्रूशी गैरवर्तन केलं. जेव्हा क्रू मेंबर्सनी तिला रोखायचा प्रयत्न केला, तेव्हा तिने एकाच्या चेहऱ्यावर ठोसा मारला, तर दुसऱ्याला चापटी मारली. हे सगळं पाहिल्याबरोबर बाकीचे क्रू मेंबर्सही तिथे आले. तेव्हा त्या महिलेने स्वतःचे कपडे उतरवायला सुरुवात केली.

    त्यानंतर ती महिला अर्धनग्नावस्थेत सीट्सच्या मधल्या जागेतून फेऱ्या मारू लागली. त्यामुळे केबिन क्रू आणि अन्य प्रवाशांनाही धक्काच बसला. त्यानंतर कसंबसं तिला रोखेपर्यंत काही काळ हा प्रकार सुरूच होता. विमान मुंबईत उतरल्यानंतर त्या महिलेला एअर विस्ताराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. दरम्यानच्या काळात केबिन क्रूकडून पोलिसांकडे तक्रा करण्यात आली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला सहार पोलिसांच्या ताब्यात दिलं.'

    फ्लाईटमधील मस्ती भोवणार! महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर होणार मोठी कारवाई

     पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं, 'हल्ला केल्याचा, क्रू मेंबरच्या कामात ढवळाढवळ केल्याचा, तसंच विमानविषयक 1937च्या नियमांनुसार, विमानातली शिस्त, सुव्यवस्था मोडून सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तसंच, भारतीय दंडविधानाच्या काही कलमांनुसारही तिच्या वर्तनाच्या अनुषंगाने आरोप ठेवण्यात आले. दुपारनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं आणि कोर्टाने तिला जामीन मंजूर केला.'

    विमानाचं इंजिन फेल, आजीचा आक्रोश; 18 वर्षांच्या पायलटनं हायवेजवळ केलं इमर्जन्सी लँडिंग

    'एअर विस्तारा'च्या प्रवक्त्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, 'संबंधित महिलेच्या हिंसक वर्तनामुळे कॅप्टनने वॉर्निंग कार्ड दिलं आणि तिला ताब्यात घेण्याचं ठरवलं. इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पायलट वारंवार उद्घोषणाही करत होता. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्सनुसार विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली आणि विमान उतरल्यानंतर तातडीने कारवाई करण्याबद्दल सांगण्यात आलं.'

    First published:

    Tags: Crime news, Mumbai