मुंबई 09 मे: राज्यात कोरोनामुळे वातावरण धुमसत असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विधान परिषदेसाठी दिल्लीतून काँग्रेसने एका उमेदवाराची घोषणा केली. त्याबाबतचं पत्र दिल्लीतून येताच शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. मात्र काही तासांमध्येच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस दोन जागा लढवत असल्याचं जाहीर केलं आणि उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसने दोन उमेदवार उभे न करता एक उमेदवार द्यावा आणि निवडणुक बिनविरोध व्हावी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. तशा प्रकारचा निरोप मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसकडे पोहोचवला आहे. मात्र काँग्रेस दोन उमेदवारांवर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
शिवसेनेने हवे असल्यास एक उमेदवार द्यावा असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस आक्रमक असून दोन उमेदवारांवर ठाम आहे. राज्यातल्या नेत्यांना दिल्लीतून तशा प्रकारच्या सूचना आल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करणार असून त्यातून मार्ग निघेल असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं.
प्रदेश काँग्रेसचे सचिव असलेले राजेश राठोड हे काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा आहे तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. हे दोनही उमेदवार बहुमताने विजयी होतील, याची मला खात्री आहे. pic.twitter.com/3UFXRzezD4
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 9, 2020
भाजपकडून कोण आहे मैदानात?
दिग्गज नेत्यांना डावलत भाजपने विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
अरे देवा! भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त
भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. या ट्विटमध्ये पंकजा यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे पंकजा मुंडेंना कदाचित याची कल्पना होती का, याची चर्चा होऊ लागली आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण फोन करुन दु:ख व्यक्त करत आहेत.
350 वर्षांपूर्वी झाले होते मुस्लीम, आता दफनविधीची पंरपरा सोडून बनले हिंदू
पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद, असे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.