सत्ताधाऱ्यांसोबत की भाजपच्या बाजूने? मनसेच्या नेत्याने केला 'हा' खुलासा

सत्ताधाऱ्यांसोबत की भाजपच्या बाजूने? मनसेच्या नेत्याने केला 'हा' खुलासा

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षाची मागणी करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. या सर्व परिस्थितीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडला. यावेळी मनसे हा विरोधी पक्ष म्हणून काम करणार, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं होतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षाची मागणी करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं.

आज मुंबईतील मनसे कार्यालय राजगड इथं पक्षाच्या जिल्हा आणि तालुका अध्यक्षांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अभिजीत पानसे यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

आगामी काळात विरोधी पक्ष म्हणून मनसे जोमाने काम करणार आहे. लवकरच राज ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेणार आहे. या मेळाव्यात ते योग्य ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

तसंच या बैठकीमध्ये पक्षवाढीसाठी राज ठाकरे आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जनेत जावं, पदाधिकाऱ्यांना भेटावं अशा भावना मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर आगामी काळात पक्ष वाढवायचा जोमाने सगळ्यांनी कामाला लागू या, अशा भावनाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

त्यामुळे राज ठाकरे हे लवकरच सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतील आणि त्यानंतर मनसेचा मेळावा असणार आहे, अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली.

विशेष म्हणजे,  विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकच आमदार निवडून आला.  महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर जेव्हा विश्वासदर्शक ठराव सादर केला होता. त्यावेळी भाजपने सभात्याग केलं होतं. तर मनसेनं तटस्थ राहणे पसंत केलं होतं.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading