विधानसभेचं तिकिट पक्षाने नाकारलं तेव्हा प्रकाश मेहता नाराज असल्याची चर्चा होती. खडसे यांच्याप्रमाणेच डावललेल्या नेत्यांमध्ये मेहतांचं नाव घेतलं जात होतं. फडणवीसांविरोधातली नाराजी खडसे यांच्याप्रमाणेच प्रकाश मेहता यांनीही जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे तेही पक्ष सोडून जाणार का, या चर्चेला उधाण आलं होतं. या चर्चांना पूर्णविराम देत आपण पक्षासोबतच राहणार असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलं. "वर्ष झालं निवडणुकीला. उमेदवारी न मिळणं म्हणजे नाराज आहोत असं नाही. पक्षनेते आणि मी एकमेकांच्या संपर्कात आहोत. मी पक्षाचं काम करत राहणार. मी पक्ष सोडणार ही अजिबात चुकीची बातमी आहे", असं प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं.खडसेंबरोबर मुंबई भाजपचा मोठा नेताही पक्ष सोडणार का? प्रकाश मेहतांनीच दिलं उत्तर- पाहा - #BJP@EknathGKhadse @BJP4Maharashtra pic.twitter.com/mVTBZHmLjx
— News18Lokmat (@News18lokmat) October 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.