Home /News /mumbai /

धक्कादायक, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रकार समोर

धक्कादायक, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रकार समोर

एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालघर, 17 डिसेंबर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळी वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम 2013 (maharashtra black magic act 2013) अमलात आणला. मात्र, अजूनही या अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. याच प्रथेचा प्रयोग हा  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. तो सेल्फी ठरला शेवटचा, 13वर्षाचा मुलगा रेल्वेच्या टपावर चढून क्लिक करायला गेला.. एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे. कांजूरमार्गच्या जागेतच गृहनिर्माण प्रकल्प राबवणारे होते, राऊतांचा पलटवार अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणारे सुत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या