मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : 'बेशरम सरकार'च्या घोषणांनी सभागृह दणाणलं, भाजप आमदारांचा प्रचंड गोंधळ

BREAKING : 'बेशरम सरकार'च्या घोषणांनी सभागृह दणाणलं, भाजप आमदारांचा प्रचंड गोंधळ

 हिवाळी अधिवेशनात आज रात्री विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला

हिवाळी अधिवेशनात आज रात्री विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला

हिवाळी अधिवेशनात आज रात्री विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला

मुंबई, 28 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल (governor of maharashtra) सामना पाहण्यास मिळाला. तर दुसरीकडे आज  विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सभागृहात (winter season maharashtra 2021) प्रचंड गोंधळ पाहण्यास मिळाला. भाजपच्या नेत्यांनी हे बेशरम सरकार आहे अशा घोषणाबाजी करून गोंधळ घातला. या गोंधळातच  विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकासह अधिवेशनाचे सूप वाजले आहे.

हिवाळी अधिवेशनात आज रात्री विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. 'सरकारचा धिक्कार' असो अशा घोषणा दिल्या.

भाजप आमदार उभे राहून घोषणाबाजी करत होते. एवढंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने सत्ताधारी यांना 'बेशरम हा शब्द वापरण्यात येत होता. अखेर प्रचंड गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत करण्यात आले आहे.

त्यानंतर सभागृहातून बाहेर पडल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

(IND vs SA : एकाच दिवशी पडल्या 18 विकेट, सेंच्युरियन टेस्ट रोमांचक अवस्थेत)

'आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतील सर्वात काळा दिवस आहे. सर्वात घाबरट आणि पळपुटे सरकार आहे. विद्यापीठ विधेयकावर चर्चा सुरू असताना चुकीच्या पद्धतीने कामकाज रेटलं. विद्यापीठ ही राजकारणात नव्हते. आता उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वत:ला प्र कुलपती म्हणवून घेतले आहे. अधिकार काढून घेतले. नविन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात हा कायदा आहे. हे विद्यापीठावर कब्जा करू पहात आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.

('मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं!)

'आजवर हे टेंडरचे कागदोपत्र मागवते होते. आता विद्यापीठ ही राजकारणाचा अड्डा होईल. बहुमत असताना हे विधानसभा अध्यक्षपद निवडू शकत नाही कारण यांची माणसे यांच्या बरोबर नाहीतर आम्ही राज्यपालांकडे, न्यायालयात जाऊ. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांत भाजप आंदोलन करेल. हा काळा दिवस कुणी विसरणार नाही', असा इशाराही फडणवीसांनी दिला.

तर, हा सरकारचा आतंकवाद आहे. लोकशाहीचे उल्लंघन करत हा कायदा आणला आहे. हे बेईमानी करून सरकार आले आहे. अव्यवस्था निर्माण करण्याचे काम हे सरकार आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

First published:
top videos