पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी दिली जात आहे. आता महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू विक्री केली जाणार आहे. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. 'शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच दिले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा सवाल फडणवीसांनी केला. सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. काय आहे सरकारचा वाईन निर्णय अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी याबाबत माहिती दिली. "दुकानांना वाईन विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा फळ उत्पादनावर वायनरीज चालते. त्यांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी नवीन पॉलिसी ठरविण्यात आली आहे. एक हजार फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या दुकानांना वाईन विकण्याची परवानगी मिळणार नाही. जे सुपर मार्केट आहे त्यांना एक शो-केश निर्माण करुन वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. सुपर शॉपीमध्ये वाईन उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचा महसूल वाढविण्याचा दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. कोरोना संकटामुळे राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या संकट काळात राज्याचा महसूल वाढावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाने राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा लाभ मिळणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. जेव्हा वाईन तयार होईल त्यामधून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त ❗️ दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️ महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय ❗️ आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️ महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.