मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मविआ' सरकारला झटका; घटक पक्षांची मुंबईत बैठक, तिसरी आघाडी स्थापन करणार?

'मविआ' सरकारला झटका; घटक पक्षांची मुंबईत बैठक, तिसरी आघाडी स्थापन करणार?

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या घटक पक्षातील नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या घटक पक्षातील नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या घटक पक्षातील नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे.

मुंबई, 15 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशात तिसरी आघाडी (Third Front) स्थापन करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन करण्याची चर्चा सुरू असताना आता राज्यातही तिसरी आघाडी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi)मधील घटक पक्षांची मुंबईत (Mumbai) बैठक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सोबत असलेले घटक पक्ष नाराज आहेत. महाविकास आघाडीत असलो तरी घटक पक्षांकडे फार लक्ष देत नसल्याची त्यांची भावना आहे. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या घटक पक्षांचे एकूण आठ आमदार आहेत. आपल्याला डावलले जात असल्याचं सांगणाऱ्या या घटक पक्षांची मुंबईत बैठक सुरू आहे. "आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे निवडणूक पद्धत बदलीचा विषय आला" मुंबईतील शेकाप कार्यालयात ही घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला शेकापचे आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि इतर डावे पक्षांचे नेते उपस्थित आहेत. जर तिसरी आघाडी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे घटक पक्ष एकत्र लढणार असे बोलले जात आहे. मविआ सरकारची डोकेदुखी वाढणार? महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून दररोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरुन घेरले जात आहे. तसेच मविआतील तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याचंही वृत्त समोर येत आहे. त्यातच आता घटक पक्ष सुद्धा नाराज आहेत. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत घटक पक्ष एकत्र येऊन स्वतंत्र निवडणूक लढवली तर त्याचा परिणाम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर होणार हे नक्की आहे.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या