Home /News /mumbai /

शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार का? संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर

शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार का? संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर

शनिवारी खुद्द संजय राऊत हे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

    मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.  महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, त्यांनीच आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी खुद्द संजय राऊत हे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि एकत्र जेवण सुद्धा केले. या भेटीनंतर आज रविवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपची पुन्हा एकदा युती होणार का? असा सवाल विचारला असता राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिले. 'भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही. चर्चा करायची असले तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, असं  राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं. भेटीचं कारण काय? 'देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे.  महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. 'फडणवीस हे काही शत्रू नाही' 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो', असंही राऊत यांनी सांगितलं. कामकाजी महिलांच्या मदतीसाठी धावळी रेल्वे, पश्चिम रेल्वेनं घेतला मोठा निर्णय 'महाविकास आघाडी सरकार स्थिर' 'राज्य सरकारचा व्यवस्थिती कारभार सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. शरद पवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत आहे, त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही', असंही राऊतांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या