Home /News /mumbai /

कोरोना काळात MPSC च्या परीक्षा रद्द झाल्यामुळे वयोमर्यादा पार पडलेल्या उमेदवारांना मिळणार का संधी?

कोरोना काळात MPSC च्या परीक्षा रद्द झाल्यामुळे वयोमर्यादा पार पडलेल्या उमेदवारांना मिळणार का संधी?

आज मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : कोरोनामुळे (CoronaVirus) अनेक क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान कोरोना काळात स्पर्धा परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असल्याचं दिसत आहे. जानेवारी महिन्यात राज्य लोकसेवा परीक्षेच्या परीक्षांची पहिली प्राथमिक परीक्षा होणार आहे. तरुण मंडळी अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. मात्र गेल्या वर्षी परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. त्यात अनेकांच्या वयोमर्यादाही पार झाली आहे. हे ही वाचा-NDA Recruitment 2021: महिलांच्या NDA प्रवेशासाठी काय असतील शारीरिक फिटनेस निकष? त्यामुळे या उमेदवारांना संधी मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील एक ट्विट केलं आहे. (Will there be an opportunity for candidates who have crossed the age limit due to cancellation of MPSC exams during Corona period) कोरोना काळात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार झालेल्या उमेदवारांना नोकरभरतीच्या नवीन जाहिरातीत अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचं अशोक चव्हाण यांनी ट्विट करून सांगितलं. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) इथे लवकरच 80 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ashok chavan, Corona spread, Maharashtra, Mpsc examination

    पुढील बातम्या