मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

काय आहे सरकारचा प्लान?

काय आहे सरकारचा प्लान?

काय आहे सरकारचा प्लान?

मुंबई, 9 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काल दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. यानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यानिमित्ताने ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) 92 नगरपरिषदा (Nagar Parishad Election) आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation ) अनिवार्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र सत्ता बदलानंतर शिंदे आणि फडणवीसांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. आजही पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना याबाबत सवाल विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका घेणे योग्य होणार नाही. या शिवाय सध्या पाऊस आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं शिेदेंनी यावेळी सांगितलं. ओबीसी आरक्षणाचा विचार करता निवडणूक पुढे ढकलाव्या यासाठी सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत तुषार मेहता यांच्यासोबत चर्चा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी दोन्ही नेत्यांनी घेतल्या. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तेथे चर्चा होईल यांची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

-मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे.

-राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत.

-लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा देखील आवश्यक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन समजून घेणार आहोत. केंद्राजी मदत मिळाल्यास राज्य वेगाने प्रगती करतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena, ओबीसी OBC