मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रझा अकादमीवर कारवाई करणार की नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल

रझा अकादमीवर कारवाई करणार की नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल

प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण आहे.

प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण आहे.

'8 नोव्हेंबरला एका राष्ट्रीय नेत्याने त्रिपुरा संदर्भात ट्विट केलं. त्यानंतर अमरावती, नांदेड अकोलामध्ये याच्या निषेधार्थ मोर्चे काढले गेलं'

 मुंबई, 27 डिसेंबर : अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या (amravati violence) घटनेचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमटले. रझा अकादमीकडून राज्यात हिंसाचाराचे प्रयोग केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेवर निवेदन सादर करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

सोशल मीडियाचा वापर करून कशी दंगल घडवून आणली जाऊ शकते याच प्रात्यक्षिक बघायला मिळाले. 128 पोस्टवर विविध कारवाया त्रिपुरा पोलिसांनी केली आहे. कुठे कुराण जाळलं जातंय अशी अफवा पसरवण्यात आली. पाकिस्तानातील पडक्या इमारती दाखवून मशिदी जाळल्या जात आहेत असं दाखवलं गेलं.  मग 8 नोव्हेंबरला एका राष्ट्रीय नेत्याने त्रिपुरा संदर्भात ट्विट केलं. त्यानंतर अमरावती, नांदेड अकोलामध्ये याच्या निषेधार्थ मोर्चे काढले गेलं, असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधी यांचं नाव घेता आरोप केला.

(हेही वाचा - OMG! 9 महिने नव्हे तर 35 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; रिपोर्ट पाहून डॉक्टर शॉक)

अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता,  हजारो लोक रसत्यावर आले होते. कोविडमध्ये या मोर्चाला परवानगी दिली. पण भाजपकडून काढण्यात आलेल्या आमच्या मोर्च्याला मात्र परवानगी नाकारली गेली. मोर्चा संपवून परत जात असताना दुकानांची तोडफोड करणे सुरू केलं. या भागातल्या हिंदूंची दुकान जाणून बुजून तोडफोड करण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी केला.

ज्या दिवशी रझा अकादमीचा मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपकडून प्रतिमोर्चा निघाला. पहिल्या दिवसाचा मोर्च्यां झालाच नाही असं करत दुसऱ्या दिवशी एका मुलावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला.

एक एक व्यक्तीवर 2-4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. रझा अकादमीचे लोक असे प्रयोग करत आहे त्यांच्यावर कारवाई करणार की नाही, असा सवाल फडणवीसांनी विचारला.

पोलीस बदल्यांचा घोटाळा माझ्यासमोर आला होता. याची माहिती देशाचे होम सेक्रेटरींना दिली. तुमच्याच लोकांनी ते फोडलं आणि ते पत्रकारांना दिलं होतं. जी चौकशी होतेय त्यात लोक मान्य पण करतायत की किती पैसे देऊन ते आले. पैसे देउन आलेले पोलीस वसुलीच करणार आहे. हे रॅकेट जेव्हा मी गृहमंत्री होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ते उद्ध्वस्त केलं, असा दावाही फडणवीसांनी केला.

First published: