Home /News /mumbai /

राहुल गांधी-शरद पवार एकत्र येणार? राऊतांनी दिली काँग्रेसच्या आतली बातमी!

राहुल गांधी-शरद पवार एकत्र येणार? राऊतांनी दिली काँग्रेसच्या आतली बातमी!

'एक भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहत असेल तर आमचे प्रमुख निर्णय घेतील. पण आज काँग्रेसच्या नेतृत्वाने...'

    मुंबई, 26 जून : मोदी सरकारविरोधात (modi goverment) तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत नवी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) याबद्दल चाचपणी करत आहे. 'आज काँग्रेसच्या नेतृत्वाने एक संदेश दिलाय, राहुल गांधी (rahul gandhi) आणि शरद पवार एकत्र आले तर फायदा होईल.' अशी महत्त्वाची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाली. 'आज आम्ही एनडीएत नाही आणि upa मध्ये सु्द्धा नाही. यावर राष्ट्रीय स्तरावर एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा दिसतोय, त्यामुळे जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार साहेबांची भूमिका काही असेल , तर ती योग्य आहे' असंही राऊत म्हणाले. Facebook वर नको असलेल्या कंमेट्स अशा करा कंट्रोल, जाणून घ्या सोपी प्रोसेस 'कोणी म्हटलं तिसरी आघाडी स्थापन होतेय? एक भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहत असेल तर आमचे प्रमुख निर्णय घेतील. पण आज काँग्रेसच्या नेतृत्वाने एक संदेश दिलाय, राहुल गांधी आणि शरद पवार एकत्र आले तर फायदा होईल.' असंही राऊत म्हणाले. 'प्रताप सरनाईकांबद्दल लवकरच बातमी कळेल' 'प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली, त्यांनी त्यांची भावना या पत्रात व्यक्त केली. सरनाईक हे आजन्म ते शिवसेनेतच राहतील असं ते म्हणाले. मी हे साहेबांनाही सांगितलंय. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात लवकरच तुम्हाला एक बातमी मिळेल' असं राऊत म्हणाले. 'सगळं स्थिर स्थावर आहे. महाराष्ट्राच्या विकासाविरोधात कोणी काहीही ढोल बडवले, तरी हे राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्यांचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण होईल.  पवारांचा राजकीय मेसेज एवढाच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करत आहे. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतेय. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल' असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut, Sharad pawar, Shivsena

    पुढील बातम्या