• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'मुंबईच्या वाहतुकीमध्ये आज एक पाऊल पुढे; लवकरच..' मेट्रो कोचच्या अनावरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

'मुंबईच्या वाहतुकीमध्ये आज एक पाऊल पुढे; लवकरच..' मेट्रो कोचच्या अनावरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

'पूर्वीच्या सरकारने काम केलं नाही, असं म्हणण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. त्यानंतर या सरकारने अधिक गतीने काम केलं आहे.'

 • Share this:
  मुंबई, 29 जानेवारी : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई-चारकोप कारशेडमध्ये मेट्रो कोचचं अनावरण करण्यात आलं. लवकरच ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईच्या वाहतुकीमध्ये आज एक पाऊल पुढे टाकत आहोत. बेस्टचं आजच आधुनिकीकरणाचं लोकार्पण केलं, त्याशिवाय  1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू करत आहोत. ज्यावेळी लोकल बंद होत्या त्यावेळी बेस्टने सर्व भार वाहिला. मुंबई वाढते आहे, लोकसंख्या वाढत आहेत, येणारी 2-4 वर्ष महत्वाची आहेत. येत्या काळात बेस्टची बस संख्या 10 हजारांपर्यंत जाईल. त्याशिवाय मे- जूनमध्ये पहिली मेट्रो सुरू होईल. दुसरीकडे कोस्टल रोडच काम सुरू आहे. यानंतर मुंबईला एक आखीव रेखीव रूप येईल. हे ही वाचा-मोदी सरकार देशातील बेरोजगारांना खरंच 3800 रुपये भत्ता देत आहे? जाणून घ्या सत्य मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - लोकल सुरू केल्या, पण लोकलच्या गर्दीचा रेटा असतो. गर्दी कमी करायची म्हणून मेट्रोचा पर्याय आहे, 2-4 वर्षात हे बदलेल. - यापूर्वी रेल्वेला धूर सोडणारी गाडी म्हणून पाहिलं जात होतं, आता मेट्रोला चालकच नसेल हे देखणं रूप - कुठेही स्थगिती दिली नाही, मोठी काम मधल्या काळात कोरोनात मंदावली पण सुरू होती - लोकाभिमुख सरकार जनतेला आवश्यक त्या गोष्टी करत आहे. पूर्वीच्या सरकारची कामं रद्द केली नाहीत उलट अधिक जलद गतीने ती काम करत आहोत. - पूर्वीच्या सरकारने काम केलं नाही, असं म्हणण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. त्यानंतर या सरकारने अधिक गतीने काम केलं आहे. - या वर्षीच्या मे पर्यत मेट्रोची पहीली लाईन सुरू होईल - आपला कोस्टल रोडही दोन वर्षात सुरू होतोय
  Published by:Meenal Gangurde
  First published: