Home /News /mumbai /

पंकजा मुंडेना मंत्रिमंडळात तरी संधी मिळेल? कोणासोबत आहे टक्कर?

पंकजा मुंडेना मंत्रिमंडळात तरी संधी मिळेल? कोणासोबत आहे टक्कर?

 मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

पंकजा मुंडे समर्थकांकडून त्यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र अनेकदा त्यांना डावललं गेलं

    मुंबई, 2 जुलै :  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळाकडे लागले आहेत. एकनाथ शिंदेंचा मोठा गट आल्यानंतर आता मंत्रिमंडळात भाजपमधील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. एकनाथ गटातदेखील मंत्रीपदावरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमधून काही संभाव्य नावं चर्चेत आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवर, आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रवीण दरेकर, मनिषा चौधरी यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याकडे पंकजा समर्थकांचं लक्ष आहे. दुसरीकडे मराठा कार्ड म्हणून पंकजा मुंडेऐवजी आमदार सुरेश धस आणि गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंकजा मुंडेंना डावललं.. धनंजय मुंडे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर पंकजा मुंडे या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडे राज्यसभेच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेना राज्यसभेवर पाठवण्याचा प्लान होता. मात्र प्रत्यक्षात भाजपकडून आलेल्या नावांमध्ये पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं. विशेष म्हणजे विधान परिषदेवरही त्यांना संधी देण्यात आली नव्हती. पंकजा मुंडे समर्थकांकडून त्यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र अनेकदा त्यांना डावललं गेलं. आता मंत्रिमंडळात त्यांना जागा मिळणार की, नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Pankaja munde, Shivsena

    पुढील बातम्या