हिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू

हिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू

'आता राष्ट्रपती नको लष्कर आणा, निदान जय जवान जय किसान तरी होईल.'

  • Share this:

स्वाती लोखंडे, मुंबई 14 नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांचं लक्ष वेधन्यासाठी मोर्चा काढणारे बच्चू कडू यांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर बच्चू कडू भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राज्यापालांनाच आव्हान दिलं. येत्या 5 दिवसांत आम्ही राजभवानावर येऊन धडकणार आहोत. तुमच्यात हिंम्मत असेल तर अडवून दाखवाच असा इशारा त्यांनी दिला. अवकाळा पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण राज्यात आता सरकारच अस्तित्वात नसल्याने राज्यपालांकडे सर्व अधिकार आले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाला गाऱ्हाणं मांडायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांचा राजभवनावर जाणार मोर्चा पोलिसांनी आज रोखला. त्यानंतर त्यांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला.

आज नेमकं काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना राजकारणी मात्र सत्तास्थापनेच्या खेळात व्यस्त आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत बच्चू कडू यांनी राजभवनाच्या दिशेन मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली. तसंच नुकसान झालेली पिकं आणि फळ रस्त्यावर फेकली आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

'राष्ट्रपती नको, लष्कर आणा'

'माझं आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे. यावेळी पावसाने शेतकरी कोलमडून गेला आहे. त्याला अपेक्षा आहे की सरकारने काही करावं. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे म्हणून आम्ही राज्यपालंना भेटतो. पण आता राष्ट्रपती नको लष्कर आणा, निदान जय जवान जय किसान तरी होईल,' अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 04:48 PM IST

ताज्या बातम्या