‘युती झाली तरी किरीट सोमय्यांना मतदान नाही, कारवाई झाली तरी बेहत्तर’

‘युती झाली तरी किरीट सोमय्यांना मतदान नाही, कारवाई झाली तरी बेहत्तर’

शिवसैनिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 9 फेब्रुवारी : शिवसेना–भाजप युतीची चर्चा ट्रॅकवर येत असताना ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मातोश्री'वर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती झाल्यास भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे. 'किरीट सोमय्यांना युती झाली तरी शिवसैनिक मतदान करणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसा अहवाल विभागप्रमुखांनी 'मातोश्री'वरील बैठकीमध्ये दिला. यामध्ये पक्ष कारवाईला देखील सामोरं जाण्याची तयारी शिवसैनिकांनी दर्शवली आहे. दरम्यान, बैठकीनंतर शिवसैनिकांनी 'मातोश्री'बाहेर किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेच्या या विरोधाचा मोठा फटका किरीट सोमय्यांना बसू शकतो. ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करता लोकसभा निवडणूक किरीट सोमय्यांना जड जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांचं मातोश्रीवर शाब्दिक हल्ला

सत्तेत एकत्र असले तरी शिवसेना–भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. त्यावरून दोन्ही मित्र पक्षांनी परस्परांना लक्ष्य देखील केले आहे. शिवसेनेवर 'शाब्दिक हल्ला' चढवण्यामध्ये ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या नेहमीच आघाडीवर दिसले. मुंबई पालिका निवडणुकीदरम्यान सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, सोमय्यांनी केलेली 'माफिया' अशी टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. यावेळी शिवसेनेनं देखील किरीट सोमय्यांना 'जशास तसे' उत्तर दिले होते.

शिवसेना–भाजपमधील दुरावा वाढत असताना 'आता सबुरीनं घ्या' असा आदेश भाजप पक्ष नेतृत्वानं सोमय्यांना दिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या शांत झाल्याचं पाहायाला मिळत आहे. पण, निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांनी घेतलेली भूमिका किरीट सोमय्यांना जड जाऊ शकते असं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे.

बारामतीमध्ये कमळ फुलणार, पवारांना थेट आव्हान; मुख्यमंत्री UNCUT

First published: February 9, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading