प्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय

प्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय

प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची तुलना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केल्याने वाद झाला होता.

  • Share this:

विजय देसाई, वसई 22 ऑक्टोंबर : बहुज विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आज महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. यापुढे निवडणूक लढविणार नाही असं त्यांनी आज जाहीर केलं.   एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या विरोधात नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ते उभे होते. यापुढे कुठलीही निवडणूक लढविणार नाही असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. नवीन कार्यकर्ते निवडणूक लढवतील आणि नवे लोक कारभार पाहतील असंही ते म्हणाले. हितेंद्र ठाकूर यांच्या या घोषणेमुळे वसईच्या राजकारणात मोठे बदल घडणार आहेत.प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी दिली होती.

उदयनराजेंच्या गडाला सुरुंग लागणार? 'या' कारणामुळे वाढली डोकेदुखी

हितेंद्र ठाकूर यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठीच प्रदीप शर्मांना मैदानात उतरविल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं होतं. 90 च्या दशकात राजकारणात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असल्याचा आरोपही झाला होता.

हितेंद्र ठाकूर यांनी वसईच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. नंतर मात्र त्यांचा प्रभाव कमी होत गेला. निवडणुका न लढवणं म्हणजे हा राजकारणातून घेतलेला संन्यास नाही तर फक्त निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आरोप आणि प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तर ठाकूर यांनीही प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सचा संदर्भ देत प्रत्यारोप केले होते.

धक्कादायक! कर्नाटकातील स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची तुलना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केली होती. मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केलं म्हणून नाहीतर दाऊद पाठोपाठ यांनाही जावं लागलं असतं, असे वक्तव्य प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून केले होतं. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते संतापले होते आणि वादही झाला होता. शर्मा मुळात त्यांचे गाव सोडून इकडे आले आहेत. ते काय कोणाला सोडायला लावणार त्याचे जे म्हणणं आहे हा त्यांचा गैरसमज आहे असा पलटवार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या