मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात संचारबंदी लागू होणार, आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी येणार का? मुंबईकरांच्या प्रश्नावर मनपा आयुक्त म्हणाले...

राज्यात संचारबंदी लागू होणार, आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी येणार का? मुंबईकरांच्या प्रश्नावर मनपा आयुक्त म्हणाले...

महाराष्ट्रात उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रात उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रात उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबई, 13 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने बुधवार 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून आणखी कठोर निर्बंध लागू करण्याचं जाहीर केलं आहे. यानुसार 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम नुसार संचारबंदी (Curfew) लागू होणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरू राहणार आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या मनात विविध प्रश्न उद्भवण्यास सुरूवात झाले आहेत. मुंबईकरांच्या मनातही असाच एक प्रश्न उपस्थित होत आहे आणि तो म्हणजे "संचारबंदी लागू झाल्याने आमच्या घरी कामवाल्या बाई येणार का?" (will my house help come?) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संचारबंदीची घोषणा केल्यानंतर अनेक मुंबईकरांनी मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) यांना प्रश्न विचारला की, आमच्या घरी कामवाल्या बाई येणार का? मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर त्यांनी म्हटलं, होय... उद्या या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील. राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेत असताना आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. वाचा : Maharashtra Lockdown updates: उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री सर्व दुर्बल घटकांना दिलासा आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे. एक महिना मोफत अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल. शिवभोजन थाळी मोफत राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे. निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. . बांधकाम कामगारांना अनुदान नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील 25 लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. आदिवासी कुटुंबांना सहाय्य आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.
First published:

Tags: BMC, Lockdown, Maharashtra

पुढील बातम्या