Elec-widget

2050 पर्यंत मुंबई खरंच बुडणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं उत्तर

2050 पर्यंत मुंबई खरंच बुडणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं उत्तर

समुद्राची पातळी वाढण्याचा धोका असल्यामुळे मुंबईला मात्र बुडण्याचा धोका नाही, असा निर्वाळा देण्यात आला आहे. याबद्दल भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा, असं सरकारने राज्यसभेत सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : अमेरिकेच्या एका संस्थेने मुंबई पुढच्या 30 वर्षांत बुडणार, असा दावा केला आहे. मुंबईला बुडण्याचा धोका असल्यामुळे साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फटका बसेल, असा या संस्थेतल्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या संस्थेने हे भाकित वर्तवल्यानंतर भारतात त्यावर बरीच चर्चा झाली. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा फटका या महानगरीला बसणार का यावरही उहापोह झाला.

आता याच मुद्द्यावर सरकारने राज्यसभेत स्पष्टीकरण दिलं. समुद्राची पातळी वाढण्याचा धोका असल्यामुळे मुंबईला मात्र बुडण्याचा धोका नाही, असा निर्वाळा देण्यात आला आहे. याबद्दल भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा, असं सरकारने राज्यसभेत सांगितलं.

डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं उत्तर

राज्यसभेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, मुंबई पाण्याखाली जाण्याचा अंदाज परदेशातल्या काही मीडिया रिपोर्टसमध्ये वर्तवण्यात आला आहे पण मुंबई पूर्ण जलमय होण्याची कोणतीही चिंता नाही. 2040 - 2050 या काळात मोठा पूर येण्याची शक्यता नाही. हे भाकित वेगवेगळ्या माहितीच्या आधारे वर्तवण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

(हेही वाचा : आता 3 दिवसांतच मोबाइल नंबर होणार पोर्ट, या तारखेपासून नवा नियम लागू)

Loading...

भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्राची पातळी 3.33 सेमी ने वाढू शकते पण यामुळे हे महानगर बुडण्याचा धोका नाही.

भारतात 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे मोठं नुकसान झालं होतं, याची आठवण संसदेत करून देण्यात आली. पण भारतातली हवामानाचे अंदाज वर्तवणारी यंत्रणा सक्षम आहे आणि देशाबाहेरच्या चक्रीवादळांबद्दलचे अंदाजही भारतीय संस्थांकडून वर्तवले जातात. त्यामुळे अशा धोक्यांचे अंदाज आणि माहिती आपल्याला मिळेल, असंही सरकारने म्हटलंय. मुंबई हे शहर अतिधोका असलेल्या शहरांच्या यादीत येत नाही, अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com