मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार का? अजित पवारांचे महत्त्वाचे विधान

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार का? अजित पवारांचे महत्त्वाचे विधान

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. सचिन वाझेंबाबत आम्ही तातडीने कारवाई केली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. सचिन वाझेंबाबत आम्ही तातडीने कारवाई केली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. सचिन वाझेंबाबत आम्ही तातडीने कारवाई केली आहे.

मुंबई, 16 मार्च : मुंबईमध्ये स्फोटक सापडल्या प्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचीही बदली केली जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण, जोपर्यंत कोणतेही ठोस पुरावे हाती लागत नाही, तोपर्यंत अधिकारी काम करत राहतील, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं.

मुंबई पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी सचिन वाझे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. योग्य ती कारवाई करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. धागेदोरे कुठे जातील हे पाहत आहोत. पण अधिकारी बदली हा राज्याच्या प्रमुखांचा निर्णय आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्य सरकार आणि कोरोनाचे प्रेमसंबंध आहेत का? मनसे नेत्याचा अजब सवाल

'मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली केली जाणार आहे का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की, 'जोपर्यंत ठोस पुरावे हाती येत नाही तोपर्यंत आहे तेच अधिकारी आपलं काम करत राहतील' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

टसोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. नियमितपणे होणारी ही बैठक होती. आमच्या कामकाजाचा तो भाग होता. शरद पवार साहेब नाराज नाहीत, त्यांच्या नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कोणताही मतभेद नाही. सकाळी बैठक झाली. एकमताने निर्णय घेण्यात आले आहे, असंही अजित पवार म्हणाले.

धक्कादायक वळण, 'ती' पीपीई कीट घातलेली व्यक्ती Sachin Vaze? NIA ला संशय

तसंच, चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. सचिन वाझेंबाबत आम्ही तातडीने कारवाई केली आहे.  एनआयए त्याचं काम करत आहे तर एटीएस त्यांचं काम करत आहे. तपासातून जे सत्य बाहेर येईल. त्यानुसार, पुढे कारवाई केली जाईल, असंही अजित पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Mumbai