Home /News /mumbai /

राज्यात लॉकडाउन वाढणार की हटवणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

राज्यात लॉकडाउन वाढणार की हटवणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

ज्या प्रकारे राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्याच प्रकारे आता लॉकडाउन उठवण्याचा निर्णय देखील येईल.

    मुंबई, 24 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी येणाऱ्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली आहे. तसंच, 31 तारखेनंतर लॉकडाउन हटवण्यात येणार का? तर आता लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवा, हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ज्या प्रकारे राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्याच प्रकारे आता लॉकडाउन उठवण्याचा निर्णय देखील येईल. सरकारकडून अटी शिथिल केल्या जातील. पण, राज्यातील तमाम जनतेनं निर्णयाचं काटेकोरपणे पालन करायचं आहे.   अटी शिथिल केल्या आणि लोकांनी पुन्हा जर गर्दी केली, तर परत कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. हेही वाचा - काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए तोयबाच्या टॉप दहशतवाद्यासह 3 जण ताब्यात आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे. याचा अर्थ असा की सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ ठेवणे हे सगळं करून आपलं काम करावे  लागणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.   मुख्यमंत्र्यांनी दिली नव्या लक्षणाची माहिती आतापर्यंत ताप येणे, सर्दी, घसा दुखणे आदी लक्षणं आढळली की कोरोनाची प्राथमिक लक्षणं म्हणून चाचणी केली जात होती. अशी लक्षणं दिसली तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. पण सर्दी खोकल्यापेक्षा ताप येणं, थकवा येणं, वास येत नाही, तोंडाची चव जाणं ही नवी लक्षणं आढळून आली  आहेत. अशी लक्षणं जर आढळली तर अंगावर काढू नका. ती कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. जर 'अशी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जावे किंवा पालिकेच्या प्रशासनला याची माहिती द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, तेव्हा रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. परंतु, रक्तसाठा मोठ्या प्रमाणात जमा झाल्यामुळे तो थांबवण्यात आला होता. पण, आता आगामी काळातील परिस्थिती पाहता रक्तदात्याची महाराष्ट्राला गरज आहे. पूरेपूर काळजी घेऊन रक्तदान करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. हेही वाचा -इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी आईनं दिला नकार, मलानं उचललं टोकाचं पाऊल 'राज्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही. कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विशेष पॅकेजवरून भाजपवर टीका राज्यात सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पोकळ घोषणा करणारं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला विशेष पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची सध्या गरज असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पॅकेजची मागणी धुडकावून लावली. तसंच, राजकारण करू नका, असं वारंवार आवाहन केलं जात आहे. पण, तुम्ही कितीही टीका करा आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. आता केंद्राकडून जीएसटीचा परतावा मिळाला नाही, म्हणून आम्हीही बोंब मारायची का? आम्हाला हवी असलेली मदत केंद्राने दिली नाही, हे आम्ही सांगायचं का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या