समोर येईल त्याला आम्ही टक्कर देणारच -उद्धव ठाकरे

"कर्जमाफीनंतर सरकारने राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांची यादी विधानसभेत जाहीर करावी"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2017 05:37 PM IST

समोर येईल त्याला आम्ही टक्कर देणारच -उद्धव ठाकरे

18 आॅगस्ट : आमच्यावर समोर जो येईल त्याला आम्ही टक्कर दिल्या शिवाय राहणार नाही असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष आव्हान दिलंय.

मुंबई उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जामाफीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच, कर्जमाफीनंतर सरकारने राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांची यादी विधानसभेत जाहीर करावी. यामध्ये सर्व शेतकाऱ्यांची नावे आणि त्यांचा पत्ता असावा, असंही उद्धव म्हणालेत.

तसंच त्यांनी शिवसेनेच्या मांडणीतही काही बदल केल्याची यादीही त्यांनी जाहीर केलीय.

तर आमच्यावर समोर आल्यावर आम्ही त्यांना टक्कर देणारच असं म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष आव्हान दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2017 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...