मुंबई, 26 जून : शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. जर कायदेशीरपणे विचार केला तर खरंच त्या आमदारांचा याचा फटका बसू शकतो का? याबाबत शिवसेनेचे (Shivsena) वकील देवदत्त कामत यांनी मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले वकील?
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार अद्याप दुसऱ्या पक्षात सामील झालेले नाहीत. 2/3 आमदार गुवाहाटीला गेले आहेत. मात्र ते अद्याप दुसऱ्या पक्षात सामील झालेले नाही. त्यामुळे त्याचं पक्षातून निलंबन केलं जाऊ शकतं. आणि त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शिंदे गटाकडे या कारवाईपासून वाचण्यासाठी आता एकच पर्याय उपलब्ध आहे, तो दुसऱ्या पक्षात प्रवेश.
एकनाथ शिंदे Schedule 10 मध्ये पुरते अडकले?
संविधानातील नियमाप्रमाणे जर कोणताही आमदार पक्ष सोडून जात असेल तर त्याला Schedule 10 नुसार कोणा दुसऱ्या पक्षात सामील होणं आवश्यक असतं. आणि एकनाथ शिंदे गटामधील केवळ बच्चू कडू यांच्याकडे दुसरा पक्ष आहे, ज्याचं नाव प्रहार आहे. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये सामील होण्याचा पर्यायही आहे. मात्र जर आमदारांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला तर प्रकरण अडचणीचं ठरू शकतं. हे प्रकरण कोर्टातही गेलं तरी एकनाश शिंदे अडचणीत सापडू शकतात.
कोणत्याही परिस्थिती एकनाथ शिंदेंच्या गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावं लागेल. जर बंडखोर आमदार कोणत्याही पक्षात सामील झाले नाहीत तर निवडणुकीची परिस्थिती उद्भवू शकते. आणि यावेळी बंडखोर आमदारांना अपक्ष म्हणून लढावं लागेल. विशेष म्हणजे संविधानाच्या Schedule 10 मुळे ठाकरे गटाला मजबुती मिळून दिली आहे.
शिवसेनेचे SC वकील देवदत्त कामत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
- मी फक्त लीगल बाबींवर बोलणार
- अनेक चुकीच्या माहिती पसरवल्या जात आहेत.
- शिवसेनेकडून 16 आमदारांवर डिस्क्वालिफिकेशन नोटीस पाठवण्यात आली आहे
- पॅरा 2 1 A अंतर्गत ही नोटीस असून 10th शेड्युल कारवाई करण्यात आली आहे.
- यामागे सभागृहाबाहेर, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्यांचं नमूद केलं आहे.
-आतापर्यंत यावर आधारित अनेक निकाल लागले आहे
- 2/3 आहे म्हणून डिस्क्वालिफिकेशन लागू नाही हे खोटं ठरतं.
- एकमाथ शिंदेंचा गट आतापर्यंत कोणतंही दुसऱ्या पक्षात मर्जर झालेले नाहीत. म्हणून डिस्क्वालिफिकेशन होणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.