दिवाळीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार वाढ? आरोग्यमंत्र्यांनी दिली आजची महत्त्वाची अपडेट

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कालच्या तुलनेत आज मृत्यूचा आकडा वाढला आहे

  • Share this:
    मुंबई, 13 नोव्हेंबर : दिवाळीतील वाढणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली असताना आज राज्यात 4132 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 17,40,461 झाली आहे. तर आज 4543 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 16,09,607 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 % एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण 84,082 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यात आज 127 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. यामध्ये ठाणे मंडळ 51, नाशिक मंडळ 14, पुणे मंडळ 35, कोल्हापूर मंडळ 2, औरंगाबाद मंडळ 2, लातूर मंडळ 9, अकोला मंडळ 0, नागपूर 11 व इतर राज्यात 3 असे 127 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 9722961 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1740461 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 810267 जणांना होम क्वारंटाईन आणि 6177 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. हे ही वाचा-1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्यorn शाळा सुरु झाल्या तर महापालिकेची जबाबदारी वाढणार आहे, महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. यासाठीच मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड सेंटर्स आणमि जम्बो कोविड सेंटर्सही तूर्तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली, तर तिच्याशी मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी करुन ठेवली आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्याने, मोठ्या प्रमाणात बिहारहूनही अनेक जण येत्या काळात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. अशा स्थइतीत पुन्हा कोरोनाचे संक्रमण हू नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष तयारी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: