मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर असताना देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; फडणवीसांना मतदान करता येणार?

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर असताना देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; फडणवीसांना मतदान करता येणार?

देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार?

देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार?

Devendra Fadnavis: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता 10 जून रोजीच्या राज्यसभा निवडणुकीत ते मतदान करु शकणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 5 जून : राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) येत्या 10 जून रोजी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत काटें की टक्कर होणार असून एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वच पक्ष लहान पक्षांचे आमदार आणि अपक्षांना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग (Devendra Fadnavis tests positive for covid-19) झाला आहे. राज्यसभा निवडणूक चार दिवसांवर आली असातना देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाल्याने त्यांना मतदान करता येणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Will Devendra Fadnavis vote in Rajya Sabha Election)

मतदान करता येणार?

मुंबई महानगरपालिकेचा सध्याचा कोरोना बाधितांच्या संदर्भात जो नियम आहे त्यानुसार, एखादी व्यक्ती कोरोना बाधित झाली तर त्यांना किमान 3 दिवस त्यांना होम आयसोलेट व्हाव लागतं. तिसऱ्या दिवशी त्यांची कोविड टेस्ट करण्यात येते. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर हा व्यक्ती घरातून बाहेर पडू शकतो. जोपर्यंत कोविड बाधिताचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत होम आयसोलेशनमध्ये पुन्हा वाढ करण्यात येते.

यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत किमान 14 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक होतं. मात्र, लसीकरण आणि त्यासोबतच कोरोनाची लाट ओसरल्याने मुंबई मनपाने नियमांत बदल केले आहेत.

वाचा : राज्यसभा निवडणूक, भाजपकडून निर्णायक मतांची गोळाबेरीज झाली?

आता नव्या नियमानुसार, देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्या दिवशी कोविड टेस्ट करण्यात येईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास देवेंद्र फडणवीस निश्चितपणे राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करु शकते. पण जर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय करायचं हा प्रश्न असणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोग काय भूमिका घेतं? पोस्ट मतदानाद्वारे त्यांना मतदान करता येईल का? किंवा अपवादात्मक परिस्थितीत प्रत्यक्ष हजर राहून त्यांना मतदानाला परवानगी मिळणार का? हे पहावं लागेल.

या संदर्भात राजकीय विश्लेषकांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना मतदान करता येईल. कारण, काही राज्यांत झालेल्या मतदानावेळी कोविड बाधित मतदारांना मतदानापासून वंचित राहू नये म्हणून शेवटच्या तासात मतदानाची परवानगी दिली होती. त्यासाठी वेगळी सोय केली होती. पीपीई किट परिधान करुन किंवा स्वतंत्र बूथ देण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीत हे प्रथमच होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पहावं लागेल. पण देवेंद्र फडणवीस यांना मतदान करता येईल आणि त्यासाठी निवडणूक आयोग सुविधा देईल असं सध्या तरी दिसत आहे.

ट्विट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, "कोविड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी"

First published:

Tags: Coronavirus, Devendra Fadnavis, Rajyasabha