एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

'एकनाथ खडसे हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांना भेटणार आहे. त्यांना न भेटण्याचं काहीही कारण नाही.'

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे सध्या बंडाच्या पावित्र्यात आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात राँयल स्टोन निवास्थानी तब्बल दोन तास चर्चा झाली. चर्चे नंतर त्यांनी प्रतिक्राया देताना आम्ही सर्वजण गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं सांगितलंय. तसेच भाजपमधील नाराज नेत्यांची नावं घेत प्रकाश मेहता, राज पुरोहीत, विनोद तावडे यांचीही उपस्थिती गोपीनाथ गडावर असणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप एकनाथ खडसे यांना वेळ दिली नाही असं बोललं जात असतानाच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत देत एकनाथ खडसेंना भेटणार असल्याचं सांगितलंय. ठाकरे म्हणाले, एकनाथ खडसे हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांना भेटणार आहे. त्यांना न भेटण्याचं काहीही कारण नाही. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं.

'भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत'

खडसे म्हणाले पंकजा मुंडे यांच्याशी पारिवारिक चर्चा झाली, जुन्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे नाराज असायचे तेव्हाच्या आठवणींवर चर्चा झाली. गोपीनाथ गडावर शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. लोकं स्वःइच्छेने लाखोंच्या संख्येने येत असतात. गोपीनाथ गडावर मी, प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे जाणार आहोत. गिरीश महाजन पण येणार असंही ते म्हणाले.

माझी मनधरणी करण्याचं कारण नाही. आम्ही पक्षात गेले अनेक वर्षे नेतृत्व केलंय. इतक्या वर्षात आमची मनधरणी करण्याची वेळ आलेली नाही. आता काही नव्याने गरज उदभवली असेल तर मला माहिती नाही. कोअर कमिटीच्या बैठकीचं मला निमंत्रण नाही. गेल्या चार महिन्यापासून मला कोअर कमिटीच्या बैठकीला बोलावलं जात नाही. मला कोअर कमेटीतून काढून टाकण्यात आलं असावं. त्यामुळे काय अजेंडा आहे चर्चेचा मला माहिती नाही असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुखासारखेच वागतात, मनसेचा गंभीर आरोप

12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्यात भाजपमधले सगळे नाराज नेते सहभागी होणार आहेत.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 10, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading