Home /News /mumbai /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार ?

भाजप आमदारांनी लोकायुक्ताकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई, 12 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजप आमदारांनी लोकायुक्ताकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने तात्काळ बदल्या करू नये, असा आदेश असतानाही वर्ग एक अधिकाऱ्यांच्या नगरविकास विभागाने शासकीय आदेश धुडकावत बदल्या केल्या. त्यावर आता भाजपाने हरकत घेतली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात खुलासा करावा, अथवा लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली जाईल असे सांगितले आहे. सध्या कोरोनाचं संकट असताना तुर्तास शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये, असा शासकीय जीआर 4 मे रोजी काढला असताना 8 मे रोजी नगरविकास खात्याअंतर्गत पुणे महापालिका मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांची पुणे क्षेत्र प्राधिकरण महानगर नियोजनकार येथे बदली केली. तर गोस्वामी यांची नागपूर महाक्षेत्र प्राधिकरण येथे बदली करण्यात आली. विशेष म्हणजे केल्या जाणाऱ्या बदल्यांना मुख्यमंत्री कार्यालय परवानगी देते. त्यांच्या परवानगीमुळे बदली झाली असं सांगितलं जाते. यामुळे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वत:च्या सरकारने दिलेल्या आदेशाचा भंग केला आहे, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलं आहे. हेही वाचा - भाजपने विधानपरिषदेचा चौथा उमेदवार बदलला, अजित गोपचडे यांना हटवून 'या' नेत्याला दिली संधी शासकीय नियमनाचे पालन सरकारचे विभागच करत नसल्याचे उघड झालं आहे. वास्तविक कोरोना संकट असताना अधिकाऱ्यांची बदली नका करू, त्यांनी आहेत तिथेच कार्यरत राहावे, असे आदेश असताना पुन्हा बदली केल्याने प्रशासकीय विभागात नाराजी वाढत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या