Home /News /mumbai /

विधान परिषदेला भाजपकडून संधी मिळणार का? सदाभाऊ खोतांची सूचक प्रतिक्रिया

विधान परिषदेला भाजपकडून संधी मिळणार का? सदाभाऊ खोतांची सूचक प्रतिक्रिया

 'मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्याबाबतीत भविष्यातला निर्णय भाजप करेल'

'मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्याबाबतीत भविष्यातला निर्णय भाजप करेल'

'मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्याबाबतीत भविष्यातला निर्णय भाजप करेल'

    मुंबई, 28 मे :  विधान परिषद निवडणुकीचा (Maharashtra Legislative Council election)  कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपकडून एकूण 4 जणांना संधी मिळणार आहे. पण, मी चळवळीतला कार्यकर्ता आणि माझ्याबाबतीत भविष्यातला निर्णय भाजप करेल, अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लॉबिंगला जोरदार सुरूवात झाली आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड,  विनायक मेटे यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळणार अशी चर्चा रंगली आहे. सदाभाऊ खोत यांनी पहिल्यांदाच विधान परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्याबाबतीत भविष्यातला निर्णय भाजप करेल. मला संधी दिली जाईल किंवा नाही देणार याचा निर्णय भाजपच घेणार आहे.  मात्र, मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून कायम काम करेल, असं सदाभाऊ खोत म्हणाले. (झाड कापण्याच्या मशीनने पत्नी-मुलांचा चिरला गळा; लग्नाच्या वाढदिवशी स्वत:लाही...) तसंच, 'महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पणन मंत्र्यांनी बैठक घेऊन अनुदान द्यायला हवं होतं. फडणवीस सरकारनं अनुदान दिलं होतं. अनुदान मिळावं या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. नव्या कांद्याचा हंगाम समोर आहे. पण शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी खोत यांनी केली. (शेतात आढळले 10 मोरांचे मृतदेह, नाशिकमधील दुर्दैवी घटना) तसंच,  5 जूनला नाशिकच्या निफाड मध्ये कांदा परिषद आयोजित केली आहे. राज्यव्यापी आंदोलन करायची वेळ आणू नये.  चाळीत साठवलेल्या कांद्याच्या दरात भाव नाही. इतर राज्यात कांदा पाठवण्यासाठी वाहतूक अनुदान सरकारने द्यावा. कांद्यावर निर्यातबंदी नाही, निर्यातशुल्क शुन्य टक्के आहे. केंद्राकडून सहकार्य तर राज्य सरकारचं दुर्लक्ष होत आहे. यंदा 85 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालं आहे. पण कृषी मंत्री हे राज्याचे नाही फक्त मालेगाव पुरते, ते फक्त मालेगावकडे लक्ष देतात, अशी टीकाही खोत यांनी केली. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर दरमयान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  पुढील महिन्यात 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.  विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या